इंग्रजीला पर्याय नाही
इंग्रजीविरुद्धचा गहजब तसा नवीन नाही. भाषाभिमान्यांनी अनेकदा विविध माध्यमांतून इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. मातृभाषेतूनच सर्व शिक्षण द्यावे-घ्यावे ही कल्पना तत्त्वतः मलाही मान्य आहेच. परंतु सद्यः परिस्थितीत हा आग्रह धरणे म्हणजे आपण होऊन स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कु-हाड मारण्यासारखे आहे. तिसरे सहस्रक उगवते आहे. कोणी कितीही नाही म्हटले तरी जागतिकीक र ण (ग्लोबलायझेशन) …